Ad will apear here
Next
देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य
अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी,सकाळी अकरा वाजता लोकसभेत आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा देशाचा  अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. 

निर्मला सीतारामन
भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत. याआधी ४९ वर्षापूर्वी म्हणजेच २८ फेब्रुवारी १९७० रोजी केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदा प्रथमच लाल रंगाच्या ब्रिफकेसऐवजी लाल रंगाच्या मखमली कपड्यात अर्थसंकल्प त्या घेऊन आल्या. या नवीन पायंड्याबाबत संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार चर्चा सुरू होती. 

सध्या २.७ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर असलेली भारताची अर्थव्यवस्था जगात सध्या पाचव्या क्रमांकावर असून,२०२५ पर्यंत ती पाच लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य आहे. अमेरिका आणि चीननंतर भारताची वाटचाल जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून,या वर्षी ती तीन लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर जाईल, असे सीतारामन यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZWKCC
Similar Posts
‘नवभारत निर्मितीच्या मार्गावर जाणारा अर्थसंकल्प’ नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी, पाच जुलै रोजी त्यांचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, गरिबांना सोयी-सुविधा, संशोधन, डिजिटल अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला आहे. ‘हा
समतोल आणि दूरदृष्टीचा अर्थसंकल्प पुणे : ‘एमएसएमई सेक्टरव्दारे रोजगार निर्मितीला चालना देणे, ई-व्हेइकलच्या माध्यमातून वाहन उद्योगाला प्रोत्साहन, महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार, स्टार्टअपला गती देण्यासाठी स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याची घोषणा अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश असेलला अर्थसंकल्प हा विकासाचा समतोल साधणारा आणि दूरदृष्टीचा
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
मोदींच्या शपथविधीसाठी मराठमोळ्या शेफची ‘रेसिपी’ नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार असून, आज (३० मे २०१९) होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला जगभरातील अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह देशभरातील मान्यवर नेते आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language